सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अस आवाहन करण्यात येत आहे की, माननीय संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झाल्यामुळे व मनोजदादा यांनी आज केलेल्या आवाहन नुसार उद्या जो आपण त्यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहर व जिल्हा बंद पुकारला होता तो रद्द करण्यात येत आहे. तरी या बंदच्या निमित्ताने जिल्हयातील शेतकरी, कष्टकरी,सर्व समाजघटक , तसेच व्यावसायिक, शाळेतील व कॉलेजमधील विद्यार्थी व इतर सर्व व्यापारी संघटना यांची जी गैरसोय होणार होती. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत, तसेच उद्याच्या बंद मध्ये सहभाग नोंदवणाऱ्या शहर व जिल्ह्यातील रिक्षा संघटना,विद्यार्थी वाहतूक संघटना, व्यापारी संघटना, शाळा महाविद्यालये, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, खासगी व शासकीय आस्थापना, व सर्व व्यवसायिक संघटना, पोलिस प्रशासन यांचे माउली पवार यांनी आभार मानले आहेत.