मंगळवेढा: मंगळवेढा येथे संत परंपरा खूप मोठी आहे. शिवाय पंढरपूर हे हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वारकरी भवन उभारणीचा प्रयत्न झाला. भाविक वारकरी मंडळाने व ह भ प ज्ञानेश्वर माऊली भगरे यांनी चिकाटीने प्रयत्न केले आणि ते भवन माझ्या निधीतून होत असल्याने मला मनस्वी आनंद झाला आहे असे प्रतिपादन आ समाधान आवताडे यांनी केले. ते चोखामेळा नगर ग्रामपंचायत अंतर्गत स्थानिक आमदार निधीतून बांधलेल्या वारकरी भवन या वास्तूच्या उदघाटन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. पुढे ते म्हणाले की, भाविक वारकरी मंडळ ही संघटना अल्पवाधित लोकप्रिय झाली आहे.
या भवनचा वारकरी सेवेसाठी उपयोग होईल म्हणून हा भाग्याचा क्षण मानतो. ह भ प सुधाकर इंगळे महाराज यांच्या अध्यक्षते खाली व ह भ प गोपाळ अण्णा वासकर (महाराज ) यांच्या शुभहस्ते, ह भ प भागवत चवरे महाराज (राष्ट्रीय उपाध्यक्ष ) , जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष ) बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), मोहन शेळके (प्रदेश सचिव ), सरपंच शिवाजी सरगर, इ. च्या उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प सुधाकर इंगळे महाराज , ह भ प गोपाळ अण्णा वासकर महाराज यांनीही आपापले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमराव मोरे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले. प्रारंभी श्री संत दामाजी मंदिरापासून संत चोखामेळा नगर येथील वारकरी भवन पर्यंत बाल वारकरी दिंडी काढन्यात आली होती. दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्वती आवताडे (पंढरपूर विभाग महिला जिल्हाध्यक्ष ), ह भ प ज्ञानेश्वर भगरे (पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष ), अविनाश नांद्रेकर (शहर अध्यक्ष ), ह भ प निलेश गुजरे (तालुकाध्यक्ष), ह भ प संगीता अवताडे (शहर महिला अध्यक्ष ), मल्लिकार्जुन राजमाने, संत चोखामेळा नगरचे सरपंच शिवाजी सरगर, भारत गवळी यांच्यासह अखिल भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी व संत चोखामेळा नगर ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.ज्ञानेश्वर भगरे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महिला व पुरुष भाविकांची प्रमुख उपस्थिती होती.