जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिर प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा अर्थात आद्यगुरु महर्षी व्यास यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मॅडम, पालक सदस्य विलास पवार,अविनाश शिंदे, शेख कार्यक्रमाच्या बाल अध्यक्ष ज्ञानेश्वरी शिंदे यांच्या हस्ते सरस्वती माता व संस्थेचे संस्थापकआदरणीय स्व. विष्णुपंत( तात्यासाहेब) कोठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यानंतर मुलींनी गुरुवंदना गायली. विद्यार्थ्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी गुरु विषयीच्या आपल्या कृतज्ञता पर भावना व्यक्त केल्या. यावेळी शिक्षकांच्या वतीने बिभीषण सिरसट सर यांनी विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींच्या माध्यमातून गुरु महात्म्य सांगत मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मॅडम व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आयेशा शेख हिने केले तर आभार प्रदर्शन प्रगती पवार हिने केले. सदर कार्यक्रमाचे संयोजन इयत्ता 7वी डॉ. सी. व्ही. रमण गटाने केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्गशिक्षक बिभीषण सिरसट सर यांचे मार्गदर्शन तर मनीषा कांबळे मॅडम, मंजुषा जाधव मॅडम मल्लिनाथ टाकळे सर व दासी मॅडम यांचे सहकार्य लाभले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते निंगप्पा गडदे सर यांच्या वतीने शाळेतील होतकरू हुशार विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक व पालकांची उपस्थिती होती.