सिद्धेश्वर तलाव परिसर उध्वस्त करण्याचे आणखी काम सुरूच…

0
79

सोलापूर : सोलापूर शहरवासीयांना फिरण्यासाठी अत्यंत रमणीय असा परिसर म्हणजे सिद्धेश्वर तलाव. सोलापूर महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेतून या ठिकाणी तब्बल 18 कोटी खर्च करून परिसर विकसित करण्यात आला शिवाय 1.6 किलोमीटर लांबीचा हा वॉकिंग ट्रॅक अत्यंत सुंदर छान झाला स्मार्ट सिटी योजनेतून जी काही मोजकी दोन-तीन चांगली कामे झाली त्यातील सिद्धेश्वर तलाव परिसर हे एक काम. मात्र या कामाला देखील नजर लागली आणि गेल्या महिन्याभरापासून सिद्धेश्वर तलाव परिसरातील वॉकिंग ट्रॅक खोदण्याचे काम जोमाने सुरू आहे ते अजूनही सुरूच आहे.

महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ ढेंगळे पाटील यांना ज्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी या कामात चूक केली त्यांच्यावर कारवाई करा असे पत्र दिले मात्र अद्याप काहीच कारवाई झाली नाही. श्रावण महिन्यात सिद्धेश्वर मंदिराला येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी आहे शिवाय तलाव परिसरात सकाळच्या वेळी शेकडो लोक फिरायसाठी येतात त्यांना गेल्या महिन्याभरापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवारपासून पुन्हा ज्या ठिकाणी खोदकाम केले तिथून पुढे खोदकाम जोमाने करण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले. महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी अधिकारी भेट देऊन पाहणी करावी मग त्यांना वस्तुस्थिती कळेल