आजपासून दूध, दही महागलं; ‘या’ कंपनीने वाढवले दर

0
18

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दूधाचे भाव सातत्याने वाढत आहेत. आता पुन्हा दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मदर डेअरीने दुधाचे दर वाढवल्यानंतर आता कर्नाटक मिल्क फेडरेशनने नंदिनी ब्रँडचे दूध (प्रति लिटर) आणि दही (प्रति किलो) यांच्या दरात 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. गुरुवारपासून नवीन दर लागू झाले आहेत. KMF च्या व्यवस्थापकीय संचालकांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विशेष दूध, शुभम, समृद्धी आणि संतृप्ति आणि दही यासह 9 प्रकारच्या दुधाच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.

दूध आणि दह्याचे नवे दर
डबल टोन्ड दुधाची किंमत आता ३८ रुपये, टोन्ड दूध ३९ रुपये, एकजिनसी टोन्ड दूध ४० रुपये, एकजिनसी दूध ४४ रुपये, विशेष दूध ४५ रुपये, शुभम दूध ४५ रुपये, समृद्धी दूध ५० रुपये आणि संपृक्त दूध ५२ रुपये प्रति लिटर असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालकांनी दिली. नंदिनी दहीची किंमत 47 रुपये असेल.