सोलापूर दि. 11 (जि.मा.का.) : – भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परिक्षेची पूर्व तयारी प्रशिक्षण जाणार आहे. या पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन दलातील अधिकारी होण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 3 ऑक्टोंबर 2023 ते 12 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या कोर्स चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.
मुलाखतीस येताना सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील एसएसबी 54 कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांने प्रिंट दिलेल्या किंवा व्हाटसअप क्रमांकावर 9156073306 या मोबाईल नंबर वर एसएसबी 54 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करून दिले जाईल. शिफारस पत्र त्यासोबत असलेली परिशिष्टाची प्रिंट व ते पुर्ण भरून सोबत आणावे.
एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे.त्यानुसार कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एकझामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एकझामिनेशन पास झालेले असावे. एनसीसी (सी) सर्टिफिकेट (ए) /(बी) ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रेजुएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीमसाठी एसएसबी कॉल लेटर असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल यादीत नांव असावे. पात्रता प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई मेल आयडी [email protected] व दुरध्वनी क्र. 0253- 2451032 व भ्रमणध्वनी क्र. 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.