सांगली ( सुधीर गोखले) – नुकतेच जिल्ह्यातील पलूस गावामध्ये एका जिम संबंधित विक्री करणाऱ्या विविध वस्तू च्या आणि सप्लिमेंट विक्री शॉप वर पोलिसांनी ‘रेड’ टाकून अमली पदार्थाचे इंजेक्शन जप्त केले आणि शहरा बरोबर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली सध्या तरुणाई मध्ये ‘जिम’ नावाचा प्रकार भलताच फेमस होत चालला आहे चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या नायकासारखी आपली शरीर यष्टी असावी यासाठी चांगल्या आधुनिक जिम च्या शोधात युवक युवती असतात जिम मध्ये मिळणाऱ्या चांगल्या सोइ सुविधा बरोबरच काही जिम मध्ये तर फिटनेस ट्रेनर आणि आहार तज्ञ नेमलेले असतात जे युवकांना चांगल्या शरीरासाठी मंत्र देतात अलीकडे सापडलेल्या या इंजेक्शन मुळे पालक वर्ग चांगलाच धास्तावला आहे व्यायाम करण्यासाठी आलेल्या युवकांना अशास्त्रीय पद्धतीने हे इंजेक्शन विकले जात होते.
काही जिम मधून प्रशिक्षक स्टेरॉईड इंजेक्शन चे सल्ले देतात. पण स्टेरॉईड सेवन हे आपल्या शरीराला किती अपायकारक आहे हे काही तज्ञ डॉक्टरांबरोबर झालेल्या संवादानंतर जाणवले. पण आजची तरुण पिढी कोणताही मागचा पुढचा विचार कोणताही विचार न करता या आणि अशा अनेक पदार्थांचे सेवन करतात जे आरोग्याला घातक आहे अशास्त्रीय आहे. पण आपले शरीर अधिक पिळदार करण्याच्या नादामध्ये हे तरुण अमली पदार्थाच्या विळख्यात अडकत चालले आहेत.
पलूस हे गाव तसे सधन आहे तालुक्याचे ठिकाण आहे तर काही प्रमाणावर चांगल्या मोठ्या जिम या भागात आहेत तसेच जिम संबंधित वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत पण काही दुकानांमध्ये अशास्त्रीय पद्धतीच्या पदार्थांची विक्री होत आहे काही काही दिवसांपूर्वी अशाच एका दुकानांमधून हे अशास्त्रीय इंजेक्शन जप्त केले गेले अन्न आणि औषध प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन अशा अपप्रवृत्तींना वेळीच ठेचले नाही तर काळ मात्र सोकावेल आणि उद्याचे बलशाली भारत देश घडवणारा तरुण या नशील्या जगामध्ये वाहून जाऊन बरबाद होईल