जिल्हा परिषद कर्मचारी यांना शिस्तीचे सुनावले खडे बोल..!
सोलापूर – डोळ्याची साथ खुप वेगाने पसरत असून शाळा व अंगणवाडी मध्ये प्रामुख्याने काळजी घेणेचे सुचना देणेत आले आहेत. अशा माहिती आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान आज यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कर्मचारी यांचे बैठकीत सिईओ मनिषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषद कर्मचारी यांना शिस्तीचे खडे बोल सुनावले.
जिल्हा परिषदेत आज सिईओ मनिषा आव्हाळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. सोलापूर शहराच्या परिसरात डोळेची साथ वेगाने पसरत आहे. आरोग्य विभाग व शिक्षण विभागास याबाबत निर्देश दिले असून उपाययोजना करणेचे काम सुरू आहे. व्यापक प्रमाणात. जनजागृती व दक्षता घेतलेस साथ आटोक्यात येणार आहे. साथ आटोक्यात येईल या दृष्ट्रीने नियोजन सुरू आहे.
स्वच्छतेला प्राधान्य द्या, कामात दक्ष रहा
यशवंतराव चव्हाण सभागृहात आज क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सिईओ मनिषा आव्हाळे यांनी कर्मचारी यांना शिस्तीचे खडे बोल सुनावले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी. अधिकारी संदिप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील , उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचे सह विभाग प्रमुख उपस्थित होते. परिसरात कुठेही गुटखा, मावा, जर्दा, इतर व्यसनी पदार्थ कोणीही खाणार नाही याची दक्षता घेणेचे सुचना दिल्या. कार्यालय व परिसरात स्वच्छता ठेवा अशा सुचना देऊन कार्यालयीन वेळ पाळी. आजची शेवटची संधी असल्याच्या स्पष्ट सुचना दिल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये देखील ही शिस्त पाळली गेली पाहिजे असे सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सांगितले. अभिलेख वर्गिकरण करून घ्या. आपल्या कामाचा दर्जा व गुणवत्ता दिसू द्या. त्यांचे परिणाम क्षेत्रीय स्तरावर दिसून येत असल्याचे सांगून मुख्यालया बरोबर पंचायत समिती व ग्रामपंचायत पातळी वर देखील काळजी घ्या असे सांगून जिल्हा परिषदेचा संवाद पंचायत समिती व ग्रामपंचायतींशी कमी झाला असलेबाबत नाराजी व्यक्त केली.
कार्यालयात प्लास्टिक वापरास बंदी
विघटन न होणारे प्लास्टीक, चहाचे प्लास्टीक कप, पाण्याच्या बाटल्या आदी प्लास्टीकचा वापर पुर्णत कमी करणेचे सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी बैठकीत दिल्या. सर्वांना आयकार्ड बंधनकारक असून कार्यालयांचा परिसर स्वच्छ ठेवा. रोप देऊन स्वागत करा. सर्वांना बायोमेट्रीक सक्तीचे असेल असे सांगून ७ आॅगष्ट पासून या मध्ये कुठलीही तडजोड करणार नसल्याचे ठाम पणे सांगितले. जेवणाचे वेळेत जेवण करा. कुणीही कामाशिवाय जिल्हा परिषदेचे परिसरात फिरू नका. कार्यालयीन कामाशिवाय गप्पा मारत बसू नका. अशा स्पष्ट सुचना दिल्या.
क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंती निमित्त अभिवादन ..!
यशवंतराव चव्हाण सभागृहात आज क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचे निमित्त जिल्हा परिषदेच्या सिईओ मनिषा आव्हाळे यांनी अभिवादन केले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी. अधिकारी संदिप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील , उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचे सह विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.