जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांच्या लाभाचे वाटप

0
25

सोलापूर:- अक्कलकोट तालुक्यातील काळेगाव येथे महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. यामध्ये शिधापत्रिका, दाखले, मोफत सातबारा तसेच पंचायत समिती विभागाकडील ग्रामपंचायत निधीतून दिव्यांगासाठी पाच टक्के निधीचे चेकही लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले अक्कलकोट तहसीलदार बाळासाहेब शिरसाट तसेच अन्य तालुकास्तरीय अधिकारी, ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील प्राथमिक शाळेच्या आवारात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी शाळेची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेविषयी व अभ्यासक्रमाविषयी माहिती घेतली. त्यांच्याशी हास्यविनोद करत शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप ही त्यांनी केले.

ई-पीक पाहणी प्रात्यक्षिक –

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काळेगाव येथील तलाठ्याकडून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन ई पीक पाहणीचे प्रात्यक्षिक करून घेतले.