• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हातभट्ट्यांवर एक्साईज विभागाच्या धाडी; हातभट्टी दारु वाहतूक करणारी बोलेरोही ताब्यात

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2024
in इतर घडामोडी
0
हातभट्ट्यांवर एक्साईज विभागाच्या धाडी; हातभट्टी दारु वाहतूक करणारी बोलेरोही ताब्यात
0
SHARES
1
VIEWS

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी सेवालाल नगर येथे टाकलेल्या हातभट्टी तांड्यावरील धाडीत शंभर लिटर दारुसह अकरा हजार दोनशे लिटर रसायन जप्त करण्यात आले. तसेच सोलापूर- हैदराबाद रोडवरही बोलेरो वाहनातून वाहतूक होणारी चारशे लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी मंगळवारी सकाळी उत्तर सोलापूर तालुक्यातील सेवालाल नगर या ठिकाणच्या हातभट्टी ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत सहा गुन्ह्यात शंभर लिटर हातभट्टी दारु व अकरा हजार दोनशे लिटर गुळमिश्रित रसायन असा दोन लाख अट्ठावन हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काटेरी झुडपात दारु गाळण्यासाठी लावलेल्या भट्टीवरील आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

एका अन्य कारवाईत निरिक्षक नंदकुमार जाधव यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी त्यांच्या पथकासह सोमवारी रात्रीच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद रोडवर बोरामणी गावाच्या हद्दीत पाळत ठेवून शिवराज शिवानंद पटणे, वय 32 वर्षे रा. बोरामणी ता. दक्षिण सोलापूर या इसमास पांढ-या रंगाच्या बोलेरो क्र. MH14 AV 1148 या चारचाकी वाहनातून चार रबरी ट्यूबमध्ये चारशे लिटर हातभट्टी दारु वाहतूक करतांना पकडले. आरोपीच्या ताब्यातून वीस हजार चारशे लिटर हातभट्टी दारु व पाच लाखाचे वाहन असा एकूण पाच लाख वीस हजार चारशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितिन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक जगन्नाथ पाटील, नंदकुमार जाधव, दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, धनाजी पोवार, सुखदेव सिद, समाधान शेळके, मानसी वाघ, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, शोएब बेगमपुरे, नंदकुमार वेळापूरे, चेतन व्हनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, वाहनचालक रशिद शेख व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.

आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

Previous Post

अजित पवारांचा अर्थसंकल्प वाचा A To Z

Next Post

मनपा मुले शाळा क्रमांक 27 च्या शैक्षणिक सहलीतून जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांना भेट

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
मनपा मुले शाळा क्रमांक 27 च्या शैक्षणिक सहलीतून जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांना भेट

मनपा मुले शाळा क्रमांक 27 च्या शैक्षणिक सहलीतून जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांना भेट

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026