पर्यावरण पूरक सण ही आपली श्रीमंती – सुनील दावडा

0
30

सोलापूर – “पर्यावरण पूरक सण” ही आपल्या निसर्गाची श्रीमंती असल्याचे प्रतिपादन रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयाचे सचिव सुनील दावडा यांनी केले. नागपंचमी निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत आणि हा सण साजरा करण्याचा हेतू मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी सांगितला. नागपंचमी हा पारंपरिक सण ,जनजागृती करत, साप आणि त्याचे महत्त्व तसेच त्यांचे जीवन निसर्गसाखळीचा एक भाग आहे. नाग- साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत या विषयीची विद्यार्थ्यांना माहीती विशेष शिक्षक सोमनाथ ठाकर यांनी दिली.

नागपंचमीसाठी विद्यार्थ्यांनी वारूळ बनवले होते.रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या सचिवा जान्हवी माखीजा, माजी अध्यक्षा वंदना कोपकर, रोटरॅकट् रोटरॅक्ट क्लब च्या अध्यक्षा अनुजा कोडग यांच्या हस्ते नागाचे प्रतिकात्मक पूजन करण्यात आले. या प्रसंगी पारंपरिक पद्धतीचे खेळ ,गाणी, आणि नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि सदिच्छा भेट देण्यासाठी एम आय टी ज्युनिअर कॉलेज चे विद्यार्थी उपस्थित होते.

या समारंभास शाळेचे सचिव सुनील दावडा, जान्हवी माखीजा, वंदना कोपकर, अनुजा कोडग, रोटरॅक्ट क्लब चे सदस्य, रेणुका पसपुलें, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, सैफन बागवान, चिदानंद बेनुरे, अजित पाटील, गंगाधर मदभावी, साहेबगौडा पाटील, बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते. उपस्थितांचे
आभार सचिव सुनिल दावडा यांनी मानले.