• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2021
in मुख्य बातमी
0
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेते अकलूजचे डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कठीण परिस्थिती माणसांच्या जीवनात येते तशीच राजकीय पक्षांसमोरही येते, काँग्रेससमोरही अडचणीचा काळ आहे पण त्यातून पुन्हा पक्ष उभा राहत आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे. पक्षात तरुण पिढी निर्माण करण्याची गरज असून तरुण पिढीला काँग्रेस पक्षात काम करण्यास भरपूर वाव आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

टिळक भवनमध्ये डॉ. धवलसिंह मोहित पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला, यावेळी बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी खा. हुसेन दलवाई, प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, आ. धीरज देशमुख, सरचिटणीस मोहन जोशी, रामकिशन ओझा, प्रकाश सोनावणे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव झिशान सय्यद, राजाराम देशमुख, अमित कारंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात पुढे म्हणाले की, डॉ. धवलसिंह हे सर्वांच्या मदतीला धावून जाणारे असून धाडसाबरोबर त्यांच्यात विनयशिलताही आहे. अकलूज आणि परिसरात ते मोठे सामाजिक काम करत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत होणार आहे. काँग्रेस पक्षात त्यांचे स्वागत असून सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल यासाठी उद्यापासूनच कामाला लागा असे थोरात म्हणाले.

जेष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेस पक्ष पराभवाला घाबरणारा पक्ष नसून एकदा, दोनदा नाहीतर तीनदा काँग्रेस पक्षाचा पराभव झाला परंतु पुन्हा नव्या ताकदीने पक्ष उभा राहिला आहे. काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जाणारी तरुण पिढी प्रत्येक राज्यात आहे. धवलसिंह हे सामाजिक कार्यात धडपडणारे असून नेतृत्व, कर्तृत्वाबरोबर दूरदृष्टी असणारे तरुण नेते आहेत. काँग्रेसमध्ये येण्याचा त्यांचा निर्णय योग्य आहे. त्यांच्याबरोबर आता काही कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले असून मोठे सैन्य अजून येणार आहे.

धवलसिंह हे धाडसी नेते असून नुकतेच त्यांनी चार जिल्ह्यात लोकांचे जगणे मुश्कील करणाऱ्या बिबट्याला आपल्या जीवाची पर्वा न करता टिपले आहे. हा बिबट्या लोकांना त्रास देत होता त्याचे काम त्यांनी केले असून आता सोलापूर जिल्ह्यात त्यांना भाजपासोबत असेच दोन हात करावे लागणार आहेत, असे आ. धिरज देशमुख म्हणाले.

Previous Post

घरातून थेट रिझर्व्हेशन असलेल्या सीटपर्यंत रेल्वे पोहचवणार प्रवाशांचे सामान

Next Post

शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी २३ कोटींचा निधी

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी २३ कोटींचा निधी

शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी २३ कोटींचा निधी

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026