सोलापूर : सोलापुरातील जुने नामांकित डॉक्टर रामचंद्र पराडकर यांचे वयाच्या 83 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं आहे. मागील 7-8 वर्षांपासून ते पुण्यात स्थायिक होते. सोलापुरात हरिभाई देवकरण शाळेतील मित्रपरिवाराच्या गेटटुगेदरसाठी सोलापुरात आले होते. मित्रांची आणी सोलापुरातील जुन्या स्वकी्यांच्या गाटिभेटी घेऊन आराम करत असताना अचानक शुगर लेव्हल कमी होऊन त्यांची शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. सोलापुरातील गोरगरीब रुग्णांना नाममात्र फी घेऊन उपचार देत होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई,एक मुलगा, सुन आणी नातवंडे असा परिवार आहे. सात आठ वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर ते पुण्यात स्थायिक झाले होते.