सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटना च्या वतीने होत असलेल्या साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाठिंबा देत त्यांचे प्रश्न शासन स्तरावर सोडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न…
सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळपास 30 ते 40 वर्ष सेवा प्रामाणिकपणे करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी जिल्हा परिषद पुनम गेट येथे साखळी उपोषण सुरू आहे त्या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पाठिंबा असून या मागण्यांचा पाठपुरावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले..
सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटनेच्या मागण्या खालील प्रमाणे 1) महाराष्ट्र शासन निर्णयानुसार 50 टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करण्यात यावा व त्या रकमेचा फरक देण्यात यावा
2) 7 वेतन आयोगाप्रमाणे सेवानिवृत्त सेवकांना 1/1/ 2021 ते 31/12/ 2021 अखेर फरक देण्यात यावा
3) 80 वर्षापुढील ज्येष्ठ सेवानिवृत्त सेवक यांना वाढू पेन्शन व फरक देण्यात यावा
4) ज्या सेवकांची सेवा 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्षे झालेली आहे अशांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा
5) 5 वे 6 वे 7 वें वेतन आयोगानुसार प्रलंबित फरक रक्कम त्वरित देण्यात यावी
6) जे सेवक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना 1 जुलै ही तारीख ग्राह्य धरून वेतनवाढ देण्यात यावी
7) प्रलंबित असलेले पेन्शन विक्रीची रक्कम सत्वर देण्यात यावी
8) सेवानिवृत्त झालेले सेवकांचे अर्जित शिल्लकी रजेचे वेतन ताबडतोब देण्यात यावे
9) सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन 1 तारखेस बिनचूकपणे अदा करणे बाबत उपाययोजना करावी. या पेन्शनर संघटनेच्या मागण्या करीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले …