सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सोमवारपासून दुपारी ४ पर्यंत सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत उघडता येतील. सोलापूर जिल्हा तिसऱ्या स्तरामध्ये असल्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे . अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज दुपारी ४ पर्यंत चालू राहणार आहेत. हॉटेल्स व रेस्टॉरंटना क्षमतेच्या पन्नास टक्के दुपारी ४ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे . त्यानंतर पार्सल सेवा अथवा घरपोच सेवा चालू ठेवता येईल. सकाळी ५ ते ९ या कालावधीत मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्यांना आणि सायकलींग करणाऱ्यांना परवानगी असेल. शासकीय कार्यालयांमध्ये पन्नास टक्के उपस्थिती असणार आहे. खाजगी कार्यालये दुपारी ४ वाजेपर्यंत कामाच्या दिवशी चालू राहणार आहेत. जिल्ह्यातील मॉल/ थिएटर/ नाट्यगृहे पूर्णपणे बंद राहणार आहेत.
Home मुख्य बातमी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले सुधारित देश… जिल्हा तिसऱ्या स्तरामध्ये…सोमवार ते शुक्रवार दुकाने दुपारी ४...