सोलापूर : मराठा समाजाच्या मागण्यांबाबत तसेच मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकार उदासीन भूमिका घेत असल्याने राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने मंगळवारी सकाळी शासनाचा दशक्रिया विधी व मुंडण करून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील यांनी केंद्र सरकारचा तर अविनाश पाटील यांनी राज्य सरकारचा विधिवत दशक्रिया विधी करून मुंडन केले. तळे हिप्परगा गावातील तलावाच्या पाणवठ्यावर हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार या वेळी उपस्थित होते.