आज रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर रेल्वे विभागाचे रेल वनविहार येथील आगी पासून वाचण्यासाठी जवळपास पाच एकर जागेतील वाळलेले गवत काढण्यात आले.रामलाल प्यासे वरिष्ठ मंडल यांत्रिक इंजिनिअर, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर रेल्वे विभागाचे प्रमुख नीरज कुमार दोहरे व 50 स्वयंसेवी यांच्या उपस्थितीत काढण्यात आले.
मागील वर्षी या परिसरात आग लागल्याने बरीच झाडे मरण अवस्थेत होती व नंतर पाणी देऊन टवटवीत करण्यात आली. म्हणून यावेळी सावधगिरीने आत्तापासूनच रेल्वे विभागाचे अधिकारी, कर्मचारी स्वयंसेवी संस्था व रहिवाशी मिळून या परिसरातील झाडाच्या अवतीभोवती असलेले वाळलेले गवत काढण्याचा संकल्प केला. या श्रमदानात दोन चिमुकले सुशांत पाटील आणि सुबोधिनी वाघमारे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला
शिवाजी कदम, मुख्य पर्यावरण व गृह व्यवस्थापन अधिकारी, उत्तर मध्य रेल्वे व प्रतिभा कदम यांनी प्लास्टिक मुक्त भारत अंतर्गत जवळपास 50 जणांना दोहरे व त्यांच्या पत्नी सरिता दोहरे यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
दोहरे यांनी रेल्वे कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थानी मिळून सोलापूर जिल्ह्यांत राबविण्यात येत असलेल्या झाडे लावा व झाडांचे संगोपन उपक्रमाचे आणि रेल्वे विभागाच्या ई.एन.एच.एम. किमी चे कौतुक केले.
रामलाल प्यासे व त्यांचे पत्नी मनीषा प्यासे यांनी श्रमदान करणा-या सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी प्रवीण तळे, परशुराम लांबतुरे आणि टिम, हनुमंत नाटेकर, जितेंद्र आर. वाघमारे, संजय पोळ, मोटेगावकर इत्यादींनी पुढाकार घेतला.