सोलापूर: माणुसकी प्रतिष्ठान व आई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सेटलमेंट येथील मरगू (मास्टर) जाधव क्रीडांगण येथे मुख्यमंत्री यांची महत्वकांक्षी बहीण माझी लाडकी या महत्वकांक्षी योजनेचे मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्चशिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिलांना वर्षाला तीन गॅस टाकी महाराष्ट्र शासनाकडून मोफत देण्यात येईल. सेटलमेंट १ ते ६ भागातील नऊ समाजासाठी शासनाची असलेली मडी जागेवर जवळपास 150 एकर जागेवर स्वतंत्र उतारा देऊन वसाहत करून शासनाकडून मोफत घरे देण्यात येईल अशी घोषणा केल्याने उपस्थित हजारो महिला यांनी जनतेच्या मनातील महाराष्ट्र शासनाचा जयजयकार केला.
सदर आदर्श नगरसेविका पुरस्कार देताना माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भारत माणिक जाधव,आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहनजी डांगरे , राम गायकवाड, वसंत जाधव , भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण, वसुधा काळे,लक्ष्मी चव्हाण,वर्षा काळे, सुप्रिया काळे, महिलांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे पाऊस चालू असताना देखील हजारो महिला जागांवरून हलल्या नाहीत. व भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणूक मध्ये भाजप पक्ष व त्यांच्या मित्र पक्षाच्या बाजूने भक्कमपणे उभे राहणार असे म्हणाले.