सोलापूर : सोलापूर महापालिकेचा ९ मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला असून त्याप्रमाणे १३१ कोरोना बाधित नवीन रुग्ण आढळल्याचे स्पष्ट होते. शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत सोलापूर शहरात सात व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. प्रभाग निहाय बाधित रुग्णांची संख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक २४ मध्ये सर्वाधिक २१ नवीन रुग्ण आढळले आहेत. प्रभाग क्रमांक २६ मध्ये ११, प्रभाग क्रमांक २३ मध्ये १२, प्रभाग क्रमांक ६ मध्ये ९ नवीन रुग्ण आढळले आहेत. चोवीस तासांमध्ये रूग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या २८७ आहे. सोलापुरात जमावबंदी आणि संचारबंदी लागू केल्यापासून कोरोना बाधितांची संख्या घटत असल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.