सोलापुरात गणेशमूर्ती निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात

0
107

राज्यात येत्या 10 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. सोलापूर शहरातील विविध कारागिरांकडून लहान मोठ्या गणेशमुर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अनेक ठिकाणी गणेशमुर्ती बनववण्याचे काम अंतिम टप्प्यात असून मुर्तीकारांकडून अंतिम हात फिरवणे सुरु आहे. सोलापुरातील गणेश मूर्तीना हैद्राबाद, तेलंगणा, कर्नाटक राज्यातून मोठी मागणी होत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षेनुसार मूर्तीवर अंतिम हात फिरवण्यात मुर्तिकार दंग झाले आहेत. कोरोनामुळे मुर्तींची संख्या व उलाढालीवर मोठा परिणाम झाल्याचे मुर्तीकारांनी सांगितले. मोठी गुंतवणुक करुन उदरनिर्वाह चालविणे देखील कठीण बनत असल्याची व्यथा अनेक मुर्तीकारांनी व्यक्त केली आहे.