नवी दिल्ली : येत्या दोन वर्षात एक कोटीहून अधिक मोफत एलपीजी कनेक्शन देण्याची आणि लोकांना एलपीजी सहज मिळावा यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. देशातील 100 टक्के लोकांना स्वच्छ इंधन पोहोचवण्याचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ही योजना तयार केली गेली आहे. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.पेट्रोलियम सचिव तरुण कपूर म्हणाले की, कमी कागदपत्रं आणि स्थानिक रहिवासी पुरावा नसल्यासही कनेक्शन देण्याची योजना तयार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG Gas Cylinder) किंमती मार्च किंवा एप्रिलमध्ये कमी होऊ शकतात. प्रधान म्हणाले की, तेल उत्पादक देशांना तेलाचे उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे, जेणेकरुन भारतातील सामान्य जनतेला तेलाच्या वाढत्या किंमतींपासून दिलासा मिळेल.