सोलापूर : सहारा नगर भाग ३ मधील प्लॉट नंबर एक वर जाण्या-येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर पत्रे उभे करून , वाळू तसेच डस्ट टाकून रस्ता बंद केल्याची फिर्याद साजिद हुसेन अब्दुल लतीफ शेख यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात केली आहे. डॉक्टर युसुफ खान आणि डॉक्टर युसुफ खान यांचा मुलगा तसेच जेसीबी क्रमांक एम एच ०९ सीएल ००८३ चे मालक वसीम सातखेड यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे . पोलीस हवालदार घुगे अधिक तपास करीत आहेत.










