सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आज स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे भेट देऊन कामाजाची पाहणी केली

0
35

सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आज स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे भेट देऊन कामाजाची पाहणी केली. यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी,क्रीडा अधिकारी मुर्तूजा शाहापुरे, रेवणसिद्ध कलशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे काम अंतिम टप्प्यात आले असून जलतरण तलाव नागरिकांसाठी एक ऑगस्ट रोजी सुरु करण्यात येईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिली. तसेच यावेळी आयुक्त यांनी त्या ठिकाणी सुरू असलेल्या पार्क स्टेडियम,कबड्डीचे मैदान, खो-खोचे मैदान,हॉली बॉल मैदान,जिमखाना,स्कॉच कोर्ट येथील पूर्ण झालेल्या कामाचे सुद्धा पाहणी आवश्यकता सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.