मुंबई : सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या भेटीत उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या भेटीत उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पूरग्रस्तांसाठी मदतीचा चेक देण्यासाठी पोहोचलेल्या प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. यामुळे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी चर्चा सुरु आहे.
दरम्यान भेटीनंतर प्रवीण दरेकर यांनी या चर्चा जाहीरपणे सांगू शकत नाही असे म्हटले आहे. भेटीसंबंधी बोलताना ते म्हणाले की, ‘प्रामुख्याने महाराष्ट्रात आलेली पूरस्थिती आणि अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्याचबरोबर पूरग्रस्तांना मुंबईकरांकडून मदत जावी यासाठी मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीने दीड कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायत्ता निधीला आम्ही दिला आहे.यावेळी त्यांना बंद दाराआड झालेल्या चर्चेसंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “मी विरोधी पक्षनेता असल्याने मुख्यमंत्री भेटल्यावर स्वाभाविकपणे इतरही राजकीय गोष्टींवर चर्चा होणार. त्याच्यामुळे या चर्चा जाहीरपणे सांगण्यासारख्या नाहीत. अर्धा तास आमची वैयक्तिक भेट झाली”.