• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड; शरद पवारांसह मविआच्या नेत्यांना शिंदेंचे फोन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2023
in मुख्य बातमी
0
पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड; शरद पवारांसह मविआच्या नेत्यांना शिंदेंचे फोन
0
SHARES
0
VIEWS

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत.
पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड; शरद पवारांसह मविआच्या नेत्यांना शिंदेंचे फोन
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , विरोधी पक्षनेते अजित पवार , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , जयंत पाटील यांना फोन केला आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी उमेदवार न देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवार देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पक्षांना त्यांनी उमेदवार न देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला विरोधक किती प्रतिसाद देतात, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. कारण या दोन्ही ठिकाणी निवडणुका होणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केली आहे. कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. तर चिंचवडमध्ये कोण निवडणूक लढवणार याचा बसून निर्णय घेऊ. पण चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचे राऊत म्हणाले. या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं या दोन्ही ठिकाणी निवडणुका होणार की, बिनविरोध होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा : केसरकर
कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. केसरकर शिर्डी इथे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांश संवाद साधला. पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मागील काही काळात ती खंडित झाली होती. त्यावेळी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन ती परंपरा पुन्हा सुरू केली आहे. पवारसाहेब हे सर्वांचेच नेते आहे. त्यामुळं ते बिनविरोध निवडणूक करतील, असे दिपक केसरकरही म्हणाले.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसब्यात हेमंत रासने
चिंचवड आणि कसबा या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना अमेदवारी दण्यात आली आहे. अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहे. सातारा हे त्यांचं मुळ गाव आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. महिलांच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रीय होत्या. मात्र निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहेत. तर दुसरीकडे कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रासने हे पुणे महानगर पालिकेचे भाजपचे नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेचे भाजपचे ते दोन टर्म स्थायी समिती अध्यक्ष होते.

Previous Post

पुणे पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

Next Post

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026