• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सिईओ स्वामी यांचे संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय;
खुर्ची सोडून अपंग अभ्यागताच्या भेटीसाठी दालनाबाहेर

by Yes News Marathi
March 25, 2023
in इतर घडामोडी
0
सिईओ स्वामी यांचे संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय;खुर्ची सोडून अपंग अभ्यागताच्या भेटीसाठी दालनाबाहेर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आज ४० दिवसाच्या मसुरी येथील प्रशिक्षण कालावधीत संपवून प्रदीर्घ कालावधी नंतर जिल्हा परिषदेमध्ये रूजु झाले. योगायोगाने त्यांचा आज वाढदिवस होता. आज शनिवार व रविवार कार्यालयीन कामकाज असलेने जिल्हा परिषद सुरू आहे. या धावपळीतून वेळ काढत त्याना सुरक्षा पोलिस कर्मचारी दुधाळ यांनी अपंग अभ्यागत मनोज भोजराज टोणे हे भेटणेसाठी आले असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांचे निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी सिईओ स्वामी यांनी अपंग टोणे यांनाच जागेवर भेटणेसाठी येतो असा निरोप देऊन खुर्चीवरून उठून तडक ते अपंग टोणे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. टोणे यांनी इलेक्ट्रीक व्हील चेअरची मागणी निवेदनाद्वारे केली. समाज कल्याण अधिकारी खमितकर यांना स्वत चे मोबाईलवरून फोन करून टोणे यांची समस्या सोडविणेबाबत सुचना दिले.

सिईओ दिलीप स्वामी जिल्हा परिषदे मध्ये रूजु ..!
प्रशिक्षण कालावधी संपले नंतर आज सिईओ दिलीप स्वामी जिल्हा परिषदे मध्ये रूजू होऊन त्यांनी प्रभारी सिईओ संदीप कोहिनकर यांचे कडून पदभार घेतला. या प्रसंगी प्रभारी सिईओ संदीप कोहिणकर यांनी सिईओ दिलीप स्वामी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ तर्फेही स्वामी साहेबाना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

शासनाचा निधी वेळेत खर्च करा- सिईओ दिलीप स्वामी
सिईओ दिलीप स्वामी हे आज जिल्हा परिषदे मध्ये रूजु झालेनंतर त्यांनी विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेऊन ३१ मार्च पुर्वी निधी खर्च करणे बाबत सुचना दिले. केंद्र व राज्य शासना कडून प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करा. जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा परिषद सेस अंतर्गत मंजुर कामे वेळेत पुर्ण करा अशा सुचना आज सिईओ दिलीप स्वामी यांनी आज आढावा बैठकीत विभाग प्रमुख यांना दिल्या. या आढावा बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे हस्ते सिईओ दिलीप स्वामी यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार करून रूजू झाले बद्दल त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, अतिरिक्त लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता खरात, शिक्षणाधिकारी संजय जावीर, आरोग्य अधिकारी डाॅ. सोनल बागडे, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, कास्ट्राईब चे अरूण क्षीरसागर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक चंद्रकांत होळकर हे उपस्थित होते.

Previous Post

मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबाबत कॅगचा अहवाल सादर, निधीचा निष्काळजीपणे वापर झाल्याचा ठपका

Next Post

पोस्ट कर्मचाऱ्यांनी केला लाखोंचा घोटाळा; पुण्यात सात जणांवर गुन्हा दाखल

Next Post
पोस्ट कर्मचाऱ्यांनी केला लाखोंचा घोटाळा; पुण्यात सात जणांवर गुन्हा दाखल

पोस्ट कर्मचाऱ्यांनी केला लाखोंचा घोटाळा; पुण्यात सात जणांवर गुन्हा दाखल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group