नवी दिल्ली : स्टार्ट अप्सचं कल्चर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. हे कल्चर अधिक वाढवण्यासाठी 16 जानेवारी हा दिवस ‘नॅशनल स्टार- अप डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावासियांशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. या दशकाला भारताचा techade म्हटलं जात आहे. या दशकात इनोव्हेशन, इंटरप्रेन्यूरशीप आणि स्टार्ट अप इकोसिस्टिमला मजबूत करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात बदल करत आहे. त्याचे तीन महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्यट्ये म्हणजे इंटरप्रेन्यूरशीपला सरकारी प्रक्रियांच्या जाळ्यातून ब्युरोक्रॅटिक्स सिलोसपासून मुक्त करणं हे होय. दुसरं वैशिष्ट्ये म्हणजे इनोव्हेशनला प्रमोट करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल मॅकेनिझमची निर्मिती करणं आणि तिसरं वैशिष्ट्ये म्हणजे तरुण इनोव्हेटर्स, युवा उद्योजकांची हँडल होल्डिंग वाढवणं हे होय, असं मोदी म्हणाले.