अक्कलकोट : अक्कलकोट मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आबावाडी गावात सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी बैठक घेतली. यावेळी तालुक्याचा आणि गावाचा विकास पाहून सर्व ग्रामस्थांना एक दिलाने भाजप-महायुतीला पाठिंबा द्यावा ही विनंती केली.
आबावाडी गावात गेल्या 5 वर्षात विविध कामे करण्यात आली. रस्ते, रस्त्यांची डांबरीकरण, रस्त्यांची सिमेंटीकरण तसेच विविध मंदिरांची समाजमंडप, अनेक ठिकाणी संरक्षक भिंती तसेच पाणीपुरवठा, बंदिस्ते गटार ही आणि अशी विविध कामे मला करण्याची संधी मिळाली. यापुढेही काही कामे आपल्याला करायची असून गावकरी मला पुन्हा आमदार म्हणून विधानसभेत पाठवतील अशी खात्री सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केली.
यावेळी महीबुब मुल्ला, विलास गव्हाणे, प्रदीप पाटील, शिवशंकर चनशेट्टी, लाला राठोड, सतिश खराडे, आनंद खजुर्गीकर, उदय नरेगल, रोहिदास राठोड, नितीन मोरे, बंटी राठोड, किरण चव्हाण, उत्तम पवार, भारत मोरे, आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.