अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा प्रचार दौऱ्यानिमित्त मुळेगाव येथे गावकऱ्यांकडून मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात भाजपा महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांचे स्वागत करण्यात आले. भाजप-महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मुळेगावच्या गावकऱ्यांकडे मतदानरूपी आशिर्वाद देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तालुक्याचा, गावाचा विकास पाहून आणि महायुती सरकारने घेतलेले निर्णय पाहून मुळेगाव नक्कीच माझ्या पाठिशी उभे राहील याची खात्री आहे.
गेल्या 5 वर्षात मुळेगावात विविध विकासकामे करण्यात आली. काही कामे मंजूर असून लवकरच सुरू होतील. पाटील वस्ती ते शिंदे वस्ती, काशिदवस्ती, केनवस्ती,लक्ष्मण केन घर ते बाबूराव चेंडगे घर, पाणी टाकी ते पाटील वस्ती, भीमनगर आणि अहिल्यनगर येथे काँक्रिटचे रस्ते करणे, धवलनगर पाणी पुरवठा, हैद्राबाद ते मुळेगाव रस्ता, मुळेगाव-दर्गनहळळी-धात्री रस्ता सुधारणा अशी कामे करण्यात आली, बिरसा मुंडा नगर ते बिराजदारवस्ती पर्यंत सिमेंटचा रस्ता करणे, भीमनगर येथे बुद्धविहार बांधणे, अशोक जाधव यांच्या घराशेजारी आर.ओ. सी प्लांट बसवणे या कामांना मंजुरी मिळाली आहे.
यावेळी सौ. सविताताई भोसले, नीलकंठ पाटील, अप्पा पाटील, शिवराज जाधव, विश्वनाथ पाटील, महेश बिराजदार, नेताजी खंडागळे, राजेंद्र काकडे, रमेश केत, शिवाजी बनसोडे, गणपती बनसोडे, सचिन केत, श्रीशैल बिराजदार, प्रकाश बिराजदार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.