येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनाची महामारी आणि संचारबंदी यामुळे शहरातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता शहरातील विविध रक्तपेढी यांनी रक्तदान करावे असे आवाहन केले होते .या आवाहनाला सोलापूर शहरातील महेश नगर स्वयंसेवक मंडलाने प्रतिसाद देत सोमवारी भंवर कृपा या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले त्याला कॉलनीमधील सदस्यांनी चांगला प्रतिसाद देत 18 बाटल्या रक्त संकलन केले गरजू व्यक्तींसाठी आमचा हा छोटासा खारीचा वाटा असल्याचे मत नरेश पंचारिया व्यक्त केले सांगितले