येस न्युज मराठी नेटवर्क : करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विविध कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. भाजपकडून येत्या बुधवारी करण्यात येणारे राज्यव्यापी जेलभरो आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. याबाबत भाजपचे प्रदेश सरचिटणीस व राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माहिती दिली.