पोटनिवडणुकीचे वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले
पुण्यातील कसबा तर पिंपरीतील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीचे वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. आज या दोन्ही मतदारसंघासाठी भाजपाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
यामध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्वीनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
मागील काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार घोषित करण्याच्या हालचाली करत होतं. अखेर आज अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.