डोणगावात बाईपण भारी देवा कार्यक्रम

0
22

डोणगाव तालुका उत्तर सोलापूर येथे नागपंचमी निमित्त महिलांसाठी बाईपण भारी देवा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयश्री दिलीप माने या होत्या यामध्ये महिलांसाठी एक मिनिटाचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.

विजेते महिला ज्योती रसाळ, दिपाली पाटील व सुजाता कदम यांना पैठणी साडी भेट म्हणून देण्यात आली.
जयश्री माने यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांनी दररोजच्या कामातून स्वतः साठी वेळ काढून आपल्या आवडी निवडी जोपासले पाहिजे. तसेच महिला बचत गटांच्या महिलांना गावातील इतर महिलांनी सहकार्य केले पाहिजे .तरच गावातील उदयोग व्यवसाय वाढतील व महिला सक्षम होतील असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रा. पंचायत सदस्या गौरी आवताडे यांनी केले.

याप्रसंगी सरपंच जयश्री आमले, उपसरपंच अश्विनी सुरवसे , संध्या बुधले ,लता जावीर, स्वाती जगताप, उज्वला मेटे, मनिषा आवताडे, शुभांगी गायकवाड ,मोहिनी शिंगाडे, कीर्ती चराटे, सावित्रा पाटील , राणी दगडे, सुवर्णा गायकवाड सुरेखा वाघमारे इत्यादी उपस्थित होते.