No Result
View All Result
- सोलापूर – १७६ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या औरंगाबादकर सराफ यांच्या मोत्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ हॉटेल ऐश्वर्या येथे करण्यात आला. हे प्रदर्शन दि. २९ जानेवारीपर्यंत हॉटेल ऐश्वर्या येथे सर्वांसाठी खुले असणार आहे. यावेळी डॉ. अमोल जोशी, डॉ. उमा प्रधान, डॉ माधुरी दबडे यांनी मनोगत व्यक्त केले.
- गेली १९ वर्षांपासून भरविले जाणाऱ्या या प्रदर्शनाची सोलापूरकर आतुरतेने वाट बघत असतात. यावेळी पारंपारिक मराठमोळे दागिन्यांमध्ये वज्रटिक, चिंचपेटी, मोत्यांचा लफ्फा, तन्मणी, पेंड, बाजीराव नथ, पारंपरिक नथ, बानू नथ, वेल झुब्बा शबाना, कॉलर, रामराज तोडे, कंगन, फुलतोडा, राणीहार, चोकर, साज, पुतळी हार, ठुशी, गरसोळी, मोत्यांच्या आदी व्हरायटी उपलब्ध आहेत. कुड्या, बुगडी, वाकी, बाजूबंद काळानुसार होणाऱ्या बदलांची नोंद काळानुसार होणाऱ्या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार नव्या डिझाइनचे दागिने आहेत.
- यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत विश्वरूपे, प्रास्ताविक मोहन वैद्य यांनी केले. संजय औरंगाबादकर यांनी औरंगाबादकर व्यवसाय आणि प्रदर्शनाची माहिती दिली. आभार अमित कामतकर यांनी केले.
No Result
View All Result