• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, December 3, 2023
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) च्या अध्यक्षपदी डॉ. शीतलकुमार रवंदळे आणि सचिवपदी डॉ. संजय जाधव यांची निवड

by Yes News Marathi
November 9, 2023
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) च्या अध्यक्षपदी डॉ. शीतलकुमार रवंदळे आणि सचिवपदी डॉ. संजय जाधव यांची निवड
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी, पुणे (दि.९ नोव्हेंबर २०२३) – महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाली. यावेळी पुढील पाच वर्षाची नवीन कार्यकारिणी करीता निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पुण्यातील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांची अध्यक्षपदी, तर मुंबईच्या डॉ. संजय जाधव व डॉ. प्रशांत लोखंडे यांची अनुक्रमे सचिवपदी व कार्यकारी संचालक पदी निवड करण्यात आली. तसेच पुण्याच्या प्रा. मनोज खळदकर यांची उपाध्यक्षपदी (पुणे विभाग), प्रा. विराज बर्गे यांची कोषाध्यक्षपदी, प्रा. स्वाती मोरे यांची महिला प्रतिनिधीपदी व प्रा. दिपक पवार यांची नियामक मंडळ सदस्यपदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, डिप्लोमा, मॅनेजमेंट, फार्मसी, एमसीए, आर्ट, कॉमर्स, सायन्स इत्यादी महाविद्यालयातील सुमारे ५०० सदस्यांपैकी उपस्थित असलेल्या २१५ पेक्षा अधिक ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सनी या निवडणुक प्रक्रियेत सहभाग नोंदवला.
माटीपीओ ही राज्यस्तरावरील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरची संघटना आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील व देशातील बेरोजगार युवकांकरिता विविध रोजगार भरती मेळावे व १५९ पेक्षा जास्त कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात येते. मागील पाच वर्षात १५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना माटीपीओने रोजगार मिळवून दिला आहे.

तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची ॲप्टीट्यूड स्किल व प्रोग्रामिंग स्किल वाढावे व पर्यायाने त्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढून त्यांना चांगला रोजगार मिळावा याकरिता माटीपीओतर्फे दरवर्षी ॲप्टीट्यूड आयडॉल व प्रोग्रामिंग आयडॉल या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये राज्यभरातून सुमारे ४० हजार विद्यार्थी सहभागी होतात. त्याचप्रमाणे इंडस्ट्रीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, इंडस्ट्रीतील कार्यप्रणाली इत्यादीं बाबतीत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी याकरीता माटीपीओने मागील पाच वर्षात ७० इंडस्ट्रीतील तज्ञ मार्गदर्शकांचे सेमिनार आयोजित केले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी हा रोजगार देणारा देखील व्हावा या अनुषंगाने विविध उद्योजकता विकास कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. बदलते तंत्रज्ञान, कॅम्पस प्लेसमेंट मधील बदलते ट्रेंड, कंपनीच्या विद्यार्थ्यांकडून वाढणाऱ्या अपेक्षा इत्यादी बाबतीत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर हा अद्ययावत असावा या दृष्टीने माटीपीओ तर्फे दरवर्षी टीपीओ डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन देखील करण्यात येते. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व टीपीओंकरीता विविध कंपन्यातील तज्ञ मार्गदर्शकांच्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते.

प्रा. डॉ. रवंदळे यांची माटीपीओ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.

माटीपीओ च्या सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags: Dr. as secretaryDr. Sheetal Kumar RavandaleMATPOPresident of Maharashtra AssociationSanjay JadhavTraining and Placement Officers
Previous Post

कंत्राटी डॉक्टर, अधिकारी कर्मचा-यांचे काम बंद आंदोलनास पाठींबा – सचिन जाधव(प्रदेशाध्यक्ष)

Next Post

पोलीस विभागाने तपासावर असलेल्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा त्वरित करावा -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post
पोलीस विभागाने तपासावर असलेल्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा त्वरित करावा -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

पोलीस विभागाने तपासावर असलेल्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा त्वरित करावा -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या घडामोडी

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : अजित पवार

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : अजित पवार

December 3, 2023
तेलगंणात काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांचा चमत्कार … सीएम केसीआर यांना धक्का

तेलगंणात काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांचा चमत्कार … सीएम केसीआर यांना धक्का

December 3, 2023
सुरेश पाटलांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेशवर वर्णी; सोलापूरच्या भवानी पेठेत जल्लोष

सुरेश पाटलांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेशवर वर्णी; सोलापूरच्या भवानी पेठेत जल्लोष

December 3, 2023
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी शासकीय विभागांनी पुराव्याची तपासणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

कुमार आशीर्वाद यांच्या गडचिरोलीतील कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल

December 3, 2023

सूर्योदय सिद्धेश्वर मंदिर परिसरातला

December 2, 2023

TOP 10

  • सोलापूर महापालिकेने 226 पद भरतीची काढली जाहिरात पहा

    सोलापूर महापालिकेने 226 पद भरतीची काढली जाहिरात पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सहा तासाच्या आत पार्क चौकातील खुनाचा गुन्हा फौजदार चावङी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून उघडकीस

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अन्न प्रशासनाने सोलापुरातील ८० हॉटेलवर केली कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पार्क स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर तरुणावर प्राणघातक हल्ला

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरकरांसाठी ‘ही’ आनंदाची बातमी…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याची सकाळ बघा कशी करतो; दिवाळीच्या तोंडावर सदावर्तेंकडून एसटी संपाची हाक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्योजक युवराज राठोड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी आयोजित इंटर क्लब पर्व २ लेदर बॉल स्पर्धेची सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी फौजदार विक्रमसिंह रजपूतला अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शिल्पा येरमे यांना आमंत्रण

    0 shares
    Share 0 Tweet 0

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group