कोविडचे रुग्ण वाढत असल्यानं केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह पाच राज्यांसाठी केली सल्लागार समितीची निवड

0
15
  • नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे, यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह पाच राज्यांसाठी नवी अॅडव्हायझरी जाहीर केली आहे. यामध्ये पंचसूत्रीचं धोरण अवलंबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांना पंचसूत्रीचं धोरणं अवलंबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये टेस्ट, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि व्हॅक्सिनेशन अशा पद्धतीनं धोरणं अवलंबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
  • दरम्यान, या पाच राज्यांमध्ये कोविडच्या संसर्गानं पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. या राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं केंद्रानं याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्या एकीकडं कोविडचे रुग्ण वाढत असताना आता देशभरात H3N2 हा नवा विषाणू देखील दाखल झाला आहे. यामुळं महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक पिंपरी-चिंचवड, एक नागपूर तर एक अहमदनगरचा आहे.