सोलापूर :मकरसंक्रांत सणानिमित्त अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन बनशंकरी नगर शेळगी येथे रविवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणेच्या हस्ते दीप प्रज्वलन व सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून.कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.हळदी कुंकू समारंभ हे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करण्याचा दिवस आहे. हा दिवस स्त्रियांसाठी विशेष महत्वाचा आहे, कारण त्यांना समाजात मान-सन्मान मिळतो. हळदी कुंकू समारंभात सवाष्णींना हळदी कुंकू वाण देतात आणि त्यांच्या जीवनात सुख, शांति आणि समृद्धी आणो ही शुभेच्छा देतात.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शशिकला बुऱ्हाणपूरे – मुख्याध्यापिकाश्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळा सोलापूर ,ज्योती बिराजदार-होमिओपॅथिक सल्लागार सोलापूर ,ब्रह्मकुमारी अंजली बहेनजी -ओम शांती संचालिका शेळगी या मान्यवरांची उपस्थिती होती.प्रतिष्ठानचे काम उल्लेखनीय आहे.संक्रांतीचा सण हा महिलासाठी एक पर्वणी आहे असे मत बिराजदार यांनी मांडली,महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम म्हणून एकमेकाची विचारची देवाण घेवाण म्हणजे हाच थाट महिलांसाठी आरोग्य,शिक्षण,अध्यात्मिक या तिन्ही गोष्टी असणे महत्त्वाचे आहे.प्रतिष्ठान नेहेमी सामाजिक कार्यात अग्रेसर आहे..विशेष करून महिलाना पुढाकार देऊन सामाजिक कार्यात उभी केली आहेत. असे मत बुराहानपुरे यांनी मांडली.
प्रास्ताविक प्रतिष्ठानचे महिला अध्यक्षा श्वेता कालदीप यांनी मांडले.सुत्रसंचालन संस्थेचे महिला सदस्या सुनंदा भाईकट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीता नागणसुरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सदस्या दिव्या कालदीप,कोमल लोणी, मंजुषा पवार, शिवलीला उपासे,सौ.सुनंदा भाईकट्टी,संगीता नागणसुरे,आदींनी परिश्रम घेतले.

