No Result
View All Result
- संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी महिलांना याआधी एक हजार रुपये मानधन मिळत होते त्यात आता वाढ होणार आहे. तसेच या योजनेसाठी वयोमर्यादा 65 वर्ष केले होते तर आता ही वयोमर्यादा देखील कमी करण्याचा निर्णय सरकार करून घेण्यात आलेला आहे.
- संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा याची निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग त्यासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून सकारात्मक विचार करण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली. सर्व योजनेतील पात्र लाभार्थींना अर्थसाह्याची रक्कम अदा करण्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 3558 कोटी रुपये इतका प्रत्यक्ष खर्च झाला आहे.
- फेब्रुवारी आणि मार्च 2023 या महिन्यांचे अर्थसहाय्य वितरण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा केंद्र शासनाप्रमाणे 65 वर्षा वरून साठ करणे, कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढवणे, तसेच अनुदान वितरित करणेबाबतचे निकष बदलणे, अर्थसाह्य वाढवणे या बाबी अभ्यासासाठी एक समिती तयार करण्यात येणार आहे.
- या योजनेचा उद्धेश निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींना आर्थिक मदत करणे असा आहे. या योजनेसाठी पात्रता : वय- ६५ वर्षांपेक्षा कमी आणि कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत असणे आवश्यक आहे. एका लाभार्थ्याला दर महिना 600 रुपये आणि एकापेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला दर महिना 900 रुपये मिळतील लाभार्थ्यांना त्यांच्या मुलांना पंचवीस वर्षाचा होईपर्यंत दिले जाते त्यानुसार लाभ दिला जातो.
- अर्ज, निवास प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा सिव्हिल सर्जन आणि सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक द्वारे जारी करण्यात आलेल्या अपात्रता / रोगाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांसह तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका संपर्क करावा.
No Result
View All Result