• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आदिवासी धनगर साहित्य संमेलनानिमित्त शिस्तबद्ध ग्रंथदिंडी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 24, 2024
in इतर घडामोडी
0
आदिवासी धनगर साहित्य संमेलनानिमित्त शिस्तबद्ध ग्रंथदिंडी
0
SHARES
0
VIEWS

आदिवासी धनगर संस्कृती व परंपरांचे घडले दर्शन

सोलापूर : हलग्यांचा कडकडाट, ढोल ताशा आणि तुतारीच्या निनांदामध्ये येळकोट येळकोट जय मल्हार … बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करीत आदिवासी धनगर साहित्य संमेलनानिमित्त शिस्तबद्ध अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. याद्वारे आदिवासी धनगर संस्कृती व परंपरांचे दर्शन घडले.गजनृत्य, झांज, टिपरी, गजढोल व लेझीम पथकांचे बहारदार खेळ सादर करण्यात आले.

श्री संत सद्गुरु बाळूमामा ट्रस्ट बेलाटी आयोजित पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन दि. 24 व 25 फेब्रुवारी रोजी श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिर विजापूर बायपास हायवे बेलाटी येथे होत आहे. या निमित्ताने शनिवारि दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी बेलाटीचे श्रीराम पाटील यांच्या वाड्याजवळील श्री लक्ष्मी मंदिर येथून या ग्रंथदिंडीस मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. माजी आ. दिलीप माने यांच्या हस्ते पूजन करून ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संमेलनाचे उद्घाटक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस , महाराष्ट्र राज्य सोशल मीडियाचे राज्य अध्यक्ष राजा माने, संमेलन अध्यक्ष माजी आ. एड. रामहरी रुपनवर, संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले,स्वागत अध्यक्ष श्रीराम पाटील, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, एम. के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे, अमरजीत राजे बारगळ, कवी गोविंद काळे, माजी स्वागत अध्यक्ष प्राचार्य संजय शिंगाडे, साहित्यिक बापूसाहेब हाटकर,
,उपाध्यक्ष संभाजीराव सूळ, सिद्धारूढ बेडगनूर, अण्णाप्पा सतुबर, बाळासाहेब कर्णवर – पाटील, प्रा. कुंडलिक आलदर, बिसलसिद्ध काळे, शेखर बंगाळे, जगन्नाथ पैकेकरी आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये पालखीसह टिपरी, लेझीम , झांज, गजढोल , गज नृत्य पथके सहभागी झाली होती. महिला व पुरुष गज नृत्य पथकाने बहारदार सादरीकरण केले. टिपरी, लेझीम गजढोल, झांज पथकांनी लक्ष वेधले. जेऊरच्या हलग्यांचा कडकडाट झाला. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस असे खेळांचे विविध प्रकार सादर केले. हलग्यांच्या कडकडाटात, ढोल ताशा आणि तुतारीच्या निनांदात येळकोट येळकोट जय मल्हार … बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण करीत मंगलमय वातावरणात ही दिंडी पुढे संमेलन स्थळी मार्गस्थ झाली.

पालखीमध्ये गीता आणि होळकर शाहीतील पुस्तके

या पालखीमध्ये भगवत गीता आणि होळकर शाहीतील ऐतिहासिक पुस्तके, श्री संत सद्गुरु बाळूमामा यांची मूर्ती ठेवण्यात आली होती. येळकोट येळकोट जय मल्हार … बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष अशा उत्साही वातावरणात ही दिंडी काढण्यात आली.

या शिक्षण संस्थांचा होता सहभाग

या दिंडीमध्ये ज्ञानसंपदा प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, एम. एम. पटेल चॅरिटेबल ट्रस्ट कुंभारी, कमलाबेन पटेल बीएससी नर्सिंग परिचारिका महाविद्यालय कुंभारी, सांगली जिल्ह्यातील म्हसवड येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था यासह शहर जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. तसेच जेऊरचे हलगी पथक आवर्जून सहभागी झाले होते.

Previous Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सांख्यिकी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

Next Post

ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली, ७ मुलं, ८ महिलांसह १५ जणांचा मृत्यू, यूपीत भीषण अपघात

Related Posts

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
इतर घडामोडी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!
इतर घडामोडी

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026
ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!
इतर घडामोडी

ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!

August 14, 2026
शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…
इतर घडामोडी

शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…

August 14, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
Next Post
ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली, ७ मुलं, ८ महिलांसह १५ जणांचा मृत्यू, यूपीत भीषण अपघात

ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली, ७ मुलं, ८ महिलांसह १५ जणांचा मृत्यू, यूपीत भीषण अपघात

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026