अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा

0
12

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं काल (3 ऑगस्ट) लखनऊ येथे निधन झालं. रिपोर्टनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकाराचा सामना करत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली.

आशिष यांची पोस्ट
मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, तुम्ही जगातील सर्वोत्तम वडील होते, तुम्ही माझ्यावर जावई नाही तर मुलासारखे प्रेम केले देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.’ आशिष यांच्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली.