येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात गाजलेल्या मुल्ला बाबा टेकडी येथील खून प्रकरणातील आरोपी महबूब उर्फ फिरोज चांद साब जमादार यास त्याची प्रेयसी बिल्किस इक्बाल शेख हिचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आव्हाड यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार दंड ठोठावला आहे.
फौजदार चावडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता मयत बिल्किस हिचे लग्न इक्बाल शेख यांच्याशी नाशिक येथे झाले होते. मात्र तिच्या पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे तिने पतीला सोडून दिले. आणि सोलापूर येथे मुला बाबा टेकडी येथे राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांकडेती आली होती.
यानंतर गल्लीतच राहणारा आरोपी फिरोज याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले त्यातून अनैतिक संबंध प्रस्थापित झाले परंतु आरोपी फिरोज हा बिल्किस तिच्यावर संशय घेत होता यावरूनच दोघांमध्ये सतत वादावादी होत होती 13 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी साडेसहा वाजता मुल्ला बाबा टेकडी येथे आरोपी फिरोज जमादार यांनी बिल्किस हिचा कलिंगड कापण्याचा पुणे खून केला होता. बिल्किस याची वहिनी फैमिदा फिरोज अन्सारी यांनी याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आरोपी अटक झाली . त्यानंतर या प्रकरणी आरोपीला आता जन्मठेपेची शिक्षा लागली आहे या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी काम पाहिले