जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा – सिईओ दिलीप स्वामी यांचा इशारा

0
69

सोलापूर – पाणी देणे हे पुण्याचे काम आहे. ते अडविण्याचे पाप करू नका. जलजीवन मिशन च्या कामांना गती द्या अन्यथा कारवाई ला सामोरे जा असा इशारा सिईओ दिलीप स्वामी यांनी आज बैठकीत दिला.

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात आज जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशन च्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, उप कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, घनकचरा व्यवस्थापन सल्लागार मुकूंद आकुडे, उप अभियंता कमळे, उप अभियंता राजकुमार पांडव, समन्वयक शंकर बंडगर, सांडपाणी सल्लागार प्रशांत दबडे, प्रमुख उपस्थित होते.


जलजीवन मिशन च्या कामात येणारे अडचणी सांगा त्या साठी मदत करू असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, मुख्यमंत्री या बाबत दरमहा आढावा घेत आहे. काल पाठवा पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव जयस्वाल यांनी व्हीसी घेऊन सुचना दिले आहे. कामांना गती द्या. तालुका व गाव स्तरावर जिथे अडचणी येतील त्या ग्रुप वर सांगा. त्या सोडवू मात्र या कामाकडे दुर्लक्ष करनारे ची काय केली जाणार नाही. मनुष्य बळ देता येईल. नळजोडणीचे काम ज्या गतीने केले त्या प्रमाणे जलजीवन मिशन च्या कामांना गती द्या. डीपीआर तयार करा. या साठी शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना मदत करणेस कुणी अडचण आणलेस माझे निदर्शनास आणून द्या. सर्व शाळा व अंगणवाडी येथे नळकनेक्शन सुरू झालेचे फोटो व व्हीडीओ पाठवा. आपण गाव भेटीत पाहणी करणार असल्याचे सांगितले. चांगल्या कामांचे यशोगाथा पाठवा. सोलापूर जिल्हा जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मध्ये राज्यात टाॅप ला राहिल याची काळजी घ्या. या साठी झटून काम करावे लागेल. सोपी कामे आधी पुर्ण करा.


सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे वेळेत पुर्ण करा- सिईओ स्वामी
…………….
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ज्या १२३ ग्रामपंचायतींना तालुका स्तरावर प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली आहे अशी कामे दोन महिन्यात संपवा. पावसाळ्या पुर्वी कामे संपवा.

शुक्रवार व शनिवारी ग्रामपंचायत सुरू राहणार – सिईओ स्वामी
…………………….
जलजीवन मिशन चे कामासाठी येत्या शुक्रवारी व शनिवारी ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायती मध्ये थांबून त्यांनी ग्रामसभे मध्ये घेतलेले ठराव, जागेचे उतारे व जलजीवन मिशन साठी लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी. ज्यांनी या कामात अडचण निर्माण केलेस कारवाई करणार असल्याचे सांगितले.

अंदाजपत्रके वेळेत सादर करा- स्मिता पाटील
…………………….
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ज्या ग्रामपंचायतींची अंदाजपत्रके तयार आहेत. डीपीआर व अंदाजपत्रके जिल्हा स्तरावर तांत्रिक शाखा कडे पाठवा अशा सुचना प्रकल्प संचालक स्मिता पाटील यांनी दिल्या. व्हिलेज अॅक्शन प्लॅन ती कामे वेळेत पुर्ण करा. जिल्ह्यातील १२३ गावातील कामे वेळेत पुर्ण करा.

सर्व निकषांची पुर्तता करून अंदाजपत्रके वेळेत सादर करा – कार्यकारी अभियंता कोळी
………………………..
सोलापूर जिल्ह्सात 1007 गावांसाठी 970 योजना राबवित आहोत. कामाचा व्याप लक्षात घेता सिईओ स्वामी यांनी दिलेले सुचना प्रमाणे प्रत्येक विभागा साठी वेळा पत्रक तयार करणेत येत आहे. त्या नुसार वेळेत कामाचे नियोजन करून त्याचा पाठपुरावा करा. नळकनेक्शन चे या वर्षी ७५ हजार नळकनेक्शन चे उदिष्ठ्य देणेत आले आहे. सोर्स फायनल करून घ्या. यासाठी जे लागेल ती मदत करायला मी तयार आहे पण कामे वेळेत पुर्ण करा. अंदाजपत्रकासाठी संस्था मदतीला दिले आहेत त्यांना सहकार्य करा असे आवाहन केले.