दयानंद महाविद्यालयात येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

0
19

सोलापूर : दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर, विभागीय कृषी संशोधन केंद्र आणि रब्बी ज्वार अनुसंधान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष या निमित्ताने १७ आणि १८ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेचा विषय मिलिट्स फॉर हेलदियर लाईफ आणि सस्टेनेबल अॅग्रीकल्चर असा आहे. या परिषदेस देशाच्या विविध भागातून संशोधक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. मुंबई, पुणे, राहूरी, अमरावती भागातून 250 पेक्षा जास्त संशोधक विद्यार्थी होणार आहेत. या परिषदेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर च्या कुलगुरू माननीय डॉ. मृणालिनी फडणवीस, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू माननीय डॉ. आर. बी. गादेवार तसेच राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. ए. मराठे, ए.टी.एम.ए. चे प्रकल्प संचालक डॉ. मदन मुकणे त्यांची उपस्थिती असणार आहे. उद्घाटनानंतर १७ मार्च रोजी प्रथम सत्रामध्ये डॉ. अमौलीक व्ही. एल. यांचे बीज भाषण होईल. रब्बी ज्वार अनुसंधान संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. बसवराज रायगोंड यांचे अग्रणी व्याख्यान होईल. त्यानंतर देशभरातून आलेल्या संशोधक, प्राध्यापक व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांचे शोधनिबंध आणि भित्तीपत्रकांचे सादरीकरण होईल. सायंकाळी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १८ मार्च रोजी प्रथम सत्रामध्ये शेतीसाठी ड्रोन वापरा विषयी व्याख्यान व प्रात्यक्षिक होईल. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ट शास्त्रज्ञ डॉ. तांबाडे एल. आर. यांचे व्याख्यान होईल. दुस-या सत्रामध्ये रब्बी ज्वार अनुसंधान संशोधन केंद्राचे वरिष्ट शास्त्रज्ञ डॉ. परशुराम पात्रोठी त्यांचे तृणधान्य वरती व्याख्यान होईल.

वरील कार्यक्रम शेतकरी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थ्यांसाठी खुला असेल.
या पत्रकार परिषदेस दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक : उबाळे, प्राचार्य दामजी ,,डॉ.जे.डी जाधव, डॉ. परशुराम पात्रोठी,एस बी क्षीरसागर, प्राध्यापक ओंकार भुरळे आदी मान्यवर उपस्थित होते….