सोलापूर जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात अपवाद वगळता कूठेही पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक उपाय योजना करावी. तसेच पावसाअभावी बाधित खरिप पिकाचे पंचनामे (जाचक अटी शिथिल करुन) करावेत व पिकविमा रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच मागील वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नूकसान भरपाई रक्कम अद्यापी काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही रक्कम देखील त्वरीत शेतकऱ्यांना मिळण्याची मागणी केली.
सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले, सोलापूर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.