साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त चित्रकला स्पर्धेत विश्वजीत गिरे प्रथम

0
18

कारंबा वृत्तांत – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंबा येथे आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण १०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा विषय होता महापुरुषांचे चित्र रेखाटने, सर्वच विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट असे विविध महापुरुषांचे चित्र रेखाटले होते यातून नंबर काढणे अत्यंत कठीण गेले जवळपास सर्वच चित्र अत्यंत सुंदर व उत्कृष्ट होते त्या मधून प्रथम, द्वितीय, तृतीय असे घोषित केले ते खालील प्रमाणे.

प्रथम क्रमांक- विश्वमोहन मनोज गिरे ७ वी

द्वितीय क्रमांक-स्वराज संजय आदाटे ६ वी

तृतीय क्रमांक-श्रध्दा शिवाजी गायकवाड ६ वी

प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन व फेटा बांधून अभिनंदन व गौरव काण्यात आला व उर्वरित विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचेही कौतुक करण्यात आले. पारितोषिक वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मंडळाचे उत्सव अध्यक्ष धनराज कांबळे हे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कारंबा गावचे लोकनियुक्त सरपंच तुकाराम चव्हाण विश्वकर्मा सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रा. विनायक सुतार मा.तंटामुक्त अध्यक्ष विश्वनाथ जगताप, महादेव जाधव, ग्रा.सदस्य कालिदास कांबळे, मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक नवनाथ कांबळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राजू कदम, आरती गीरे, युवा उद्योजक विलास गायकवाड व मंडळाचे खजिनदार श्याम कांबळे, सागर जगताप व अतुल रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी प्रा. विनायक सुतार व युवा नेते अतुल रोकडे यांनी विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप देत मनोगत व्यक्त केले व शाळेच्या वतीने सोमनाथ मिसाळ यांनी मंडळाचे भरभरून कौतुक केले व आभार व्यक्त केले. मंडळाच्या वतीने आभार मानत असताना येणाऱ्या काळात देखील अश्याच प्रकारे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना व कार्यक्रम राबवणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष निलेश कांबळे यांनी ग्वाही दिली व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.