• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी २३ कोटींचा निधी

by Yes News Marathi
January 29, 2021
in मुख्य बातमी
0
शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी २३ कोटींचा निधी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभीकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यात येणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

या निधीतून पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनरुज्जीवन, गुंफांचे पुनरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मवती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा आदी विविध रस्त्यांची सुधारणा करणे, शिवसंकुल येथे पर्यावरण पर्यटन आदी कामे केली जाणार आहेत.

Previous Post

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Next Post

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे; दिल्लीतील हिंसाचारावर राष्ट्रपतींनी केली व्यक्त नाराजी

Next Post
कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे; दिल्लीतील हिंसाचारावर राष्ट्रपतींनी केली व्यक्त  नाराजी

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे; दिल्लीतील हिंसाचारावर राष्ट्रपतींनी केली व्यक्त नाराजी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group