येस न्युज मराठी नेटवर्क : COVID 19 संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पहिल्या टप्पा 16 जानेवारी 2021 शनिवार या दिवशी होणार असून त्यासाठी 13 लसीकरण ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत.
यासाठी 34000 डोस लस आलेली असून सदर लस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची आहे. लस 2 ते 8 डिग्री centigrade तापमान मध्ये ठेवावी लागते व याची पूर्वतयारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केलेली आहे.
शित साखळी अबाधित ठेवून लस लाभार्थी पर्यंत पोहोच करण्याचेही नियोजन झालेले असून सर्व ठिकाणी कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दिनांक 16 जानेवारी रोजी जिल्ह्यातील शासकीय संस्थात याचा शुभारंभ होणार असून त्यानंतर विविध शासकीय व खाजगी संस्थांमध्ये लसीकरण सुरू राहणार आहे.