मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी येस न्युज मराठी चे संपादक शिवाजी सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे. संघाचे प्रदेश अध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते त्यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. हॉटेल प्रथम मध्ये मंगळवारी दुपारी ही बैठक पार पडली
या निवड सोहळ्याप्रसंगी राकेश टोळये आणि व्यंकटेश पटवारी यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवानी शिवाजी सुरवसे यांचा सत्कार केला.
शिवाजी सुरवसे यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभवाची आणि कार्याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे असल्याचे किरण जोशी म्हणाले.
या निवडीच्या वेळी हरिभाऊ प्रक्षाळे,संतोष पवार, कृष्णकांत चव्हाण, लखन अदाटे, बिसलसिध्द काळे, अभिजित सोमशंकर, विष्णू सुरवसे, दादासाहेब जाधव, संतोष धोत्रे,विशाल परदेशी, उल्हास पाटील, अनिल शिराळकर, रंगनाथ गुरव, किशोर मारकड, चंद्रकांत वेदपाठक, मुद्दे तेजस, कल्याण कुलकर्णी, मिलिंद यादव विनोद पोतदार, आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, सोलापूर, मोहोळ, बार्शी येथील संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या निवडीबद्दल जिल्ह्यातील पत्रकार आणि विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.












