सोलापूरसह महाराष्ट्रातील प्रादेशिक विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुधारित उडान योजना – UDAN 6.0 अंतर्गत विमान कंपन्यांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेमध्ये सोलापूर-मुंबई विमानसेवेला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, सोलापूर-मुंबई आणि अमरावती-पुणे या दोन्ही मार्गांची केंद्राच्या सुधारित उडान योजनेअंतर्गत निवड झाली आहे. सुधारित उडान योजनेत केंद्र सरकारने 28 हजार 440 कोटी रुपयांची तरतूद केली असून यामध्ये पाच वर्ष विमानसेवा चालवण्यासाठी विमान कंपन्यांना अनुदान देण्यासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग साठी 10 हजार 43 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापूर्वी सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी म्हणजेच एमएडीसी कडून 2025 मध्ये टेंडर करण्यात आले होते.
सोलापूर मुंबई चे विमानसेवेचे टेंडर स्टार एयर या कंपनीला मिळाले होते. मात्र त्यांनी राज्य शासनाकडून अनुदान दिले जात असतानाही ही विमानसेवा व्यवस्थित चालवली नाही. आता केंद्र सरकार अनुदान देण्यास असून सोलापूर विमानसेवा पाच वर्ष व्यवस्थित चालेल. 6 ऑक्टोबर रोजी प्रि बीड मिटींग झाली असून डिसेंबर अखेर हे टेंडर फायनल होईल आणि जानेवारी महिन्यापासून विमान सेवा सुरू होईल. अशी आशा आहे. फ्लाय 91 या कंपनीला हे टेंडर मिळेल अशी शक्यता आहे. आम्हाला हे टेंडर मिळताच दुसऱ्या दिवशी पासून सोलापूरची विमान सेवा सुरू करणार असल्याचे फ्लाय 91 चे प्रमुख मनोज चाको यांनी येस न्यूज मराठीशी बोलताना म्हणाले. ही विमान सेवा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी येस कार्तिकेयेन यांनी देखील जोरदार प्रयत्न केले आहे त्यामुळे सोलापूरची स्थगित झालेली विमानसेवा नव्या वर्षात सुरू होईल ही आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी…










