३२५० + १०० + १०० रुपये देण्याची घोषणा; जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार दर देण्यास मान्यता
येस न्यूज मराठी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील ऊस गाळप बंद पाडण्याच्या आंदोलनानंतर पिंपळनेर (ता. माढा) येथील भाऊसाहेब ऊर्फ जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार ऊसदर देण्यास मान्यता दिली आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने
कारखान्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, यंदाच्या गाळप हंगामासाठी प्रतिटन ३२५० रुपये मूळ दर, त्यावर १०० रुपये आणि अतिरिक्त १०० रुपये असे एकूण ३४५० रुपये प्रतिटन ऊस बिल जाहीर केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा आणि आता पुणे जिल्ह्यातही पहिली उचल ३९०० जाहीर झाली आहे. तसेच कर्नाटकात ही ३७०० ते ३९०० पहिली उचल दिली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ज्यांची रिकवरी चांगली आहे त्या कारखान्यांनी ३५०० पहिली उचल व १०० अधिक २०० असा दर द्यावा म्हणून पंढरपुरात राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मागणी केली होती. त्यामुळे हा दर संघटनेला मान्य होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.











